गावाविषयी माहिती

बेरिस्ते - ओसरविरा ही ग्रामपंचायत  महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये आहे.  सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायतची  लोकसंख्या सुमारे 3521 आहे. ग्रामपंचायत मध्ये  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 6, अंगणवाडी केंद्रे 17 व व्यायामशाळा 2,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत बेरिस्ते- ओसरविरा मधील नागरिक  खास जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या  पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत तसेच  ओसरविरा शिवमंदिराला क दर्जाचे  पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जाते.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून नागली, भात, वरई, उडीद  व तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. वरई   या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

बेरिस्ते - ओसरविरा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बेरिस्ते - ओसरविरा ग्रामपंचायतीला  संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

ग्रामपंचायत बेरिस्ते – ओसरविरा आज मोखाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली  जाते.

भौगोलिक स्थान

बेरिस्ते – ओसरविरा  ही ग्रामपंचायत  मोखाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. ग्रामपंचायतचे  एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ 700  हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण 227 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३५२१ आहे. त्यामध्ये 1724 पुरुष व 1797 महिला यांचा समावेश होतो.

ग्रामपंचायतीचा  भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ  प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन काही  प्रमाणात आहे.तसेच येथील शेती  संपूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.  येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

लोकजीवन

ग्रुप ग्रामपंचायत बेरिस्ते – ओसविरा येथील लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नागली, वरई, उडीद, तूर  व हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये  विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

ग्रुप ग्रामपंचायत बेरिस्ते – ओसरविरा येथील लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावांचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

अ.क्र. तपशील संख्या
जनगणना वर्ष २०११
पुरुष १७२४
स्त्री १७९७
एकूण लोकसंख्या ३५२१

संस्कृती व परंपरा

बेरिस्ते – ओसविरा गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.  गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी बोहाडा हा उत्सव साजरा केला जातो. अनेक देवी – देवतांचे मुखवटे परिधान करून मिरवणूक काढली जाते हे एक आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व बोहाडा, हनुमान जयंती  यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे बेरिस्ते – ओसविरा गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत मारुती मंदिर,भवानी देवी मंदिर हे  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

शेती – साखरी गोंदे खुर्द  येथे भात,नाचणी व वरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील अनेक  शेतकर्यांकडे आंबा, काजू च्या बागा आहेत त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात.

जवळची गावे

आसे तसेच बेरिस्ते गाव मोखाडा तालुक्यातील उत्तरेस  असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.